*लॉकडाऊन जाहीर केलं पण त्या अगोदर सर्वसामान्यांची काय सोय केली?* – *प्रदीप भरणेकर*
*पोलीस योध्दा न्युज* वार्ता-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
तुमसर नगर परिषदेने लॉकडाऊन जरूर करावा अथवा कडक निर्बंध लावावेत मात्र त्याअगोदर तुमसर शहरातील सर्वसामान्य जनतेची काय सोय केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तुमसर शहर अध्यक्ष प्रदीप भरणेकर यांनी नगरपालिका प्रशासनाला करून सर्वसामान्य जनतेच्या, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करावे. अशी मागणी केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांनी म्हणजे राज्य सरकारने व भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या दिनांक 14/04/2021 ला अत्यावश्यक सेवेत किराणा दुकानें, भाजीपाला दुकानें,फळ विक्रेते, डेअरी बेकरी, अन्नधान्य व खाद्यदुकाने जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थाचे विक्री करण्याचे आदेशात नमूद आहे. सम्पूर्ण भंडारा जिल्ह्यात सर्व क्षेत्रात अत्यावश्यक सेवा सुरु आहेत परंतु तुमसर नगरपरिषदेने मनमर्जीने आदेश काढून गोरगरीबांच्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या लहान छोटे मोठे व्यवसायांना बंद करून त्यांच्या पोटावर पाय मारण्याचे काम स्थानिक प्रशासनाने केले आहे. आता त्याच प्रशासनाने लहान छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व गोरगरीब जनतेला 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करावे. नागरिकांना उपाशी ठेवून तुमसरातील प्रशासन मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा झाला की काय असा प्रश्न गरीब जनतेला निर्माण होत आहे.व जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम येथील प्रशासनाने केले आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259