लॉकडाउन मुळे कला क्षेत्राशी संबंधित कलावंतांचे नुकसान भरपाई बद्दल आंदोलन
प्रज्वल राऊत/भंडारा जिल्हा
भंडारा येथे प्रतिभावंत प्रबोधनकार साहित्य संघटनेमार्फत सर्वस्तरीय कलावंतांचे संगीतमय आंदोलन करण्यात आले, ही आंदोलन रॅली शासकीय विश्राम भवन भंडारा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आली. या आंदोलन रॅलीमध्ये गायन, वादन आणि नारेबाजी करून आपल्या मागण्या दर्शवण्यात आल्या.1) लॉकडाऊनमुळे झालेल्या कला क्षेत्राशी संबंधित कलावंतांची नुकसानभरपाई मिळावी.2) संगीतमय कार्यक्रम पूर्वव्रत सुरू करावा. अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलन रॅलीमध्ये मागण्यात आल्या.या आंदोलनामध्ये प्रतिभावंत प्रबोधन कला साहित्य संघटना भंडारा-गोंदिया जिल्ह्यातीलअध्यक्ष मा. भावेश कोटांगले, महासचिव राकेश वालदे, उपाध्यक्ष कु. नलिनी बोरकर, सचिव मा. दिलीप कोटांगले, सहसचिव मा. गुरुदास राउत, कोषाध्यक्ष मा. पुरुषोत्तम वासनिक, संचालक मा. रविभाऊ भवसागर, मा. प्रज्ञाशील मेश्राम, मा. संदीप कोटांगले, मा. धम्मा वासनिक, मा. चेतनजी कोचे, मा. विनोद जी मुरकुटे, आयु. गीताताई गोंडाने, आयु. अर्चनाताई कान्हेकर, मा. संदेश राऊत, मा. वसंत राउत. यांच्या सोबाताच गायक, वादक, कलाकार आणि अनेक प्रकारचे कलावंतांचा समावेश होता.
क्राइम रिपोर्टर
प्रज्वल राउत
भंडारा जिल्हा
9552875760