लायन्स क्लब गडचिरोली, व पोलिस योद्धा न्युज नेटवर्क यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत कोरोना योद्धा सत्कार समारंभ
प्रतिनिधी गडचिरोली: लायन्स क्लब, गडचिरोली द्वारे गणेश उत्सवाचे औचित्य साधून ऑनलाईन गायन स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच पोलिस योद्धा न्युज नेटवर्क तर्फे कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “कोरोना योद्धा” म्हणून सत्कार समारंभ दिनांक ३० ऑक्टोंबर २०२१ रोज शनिवारला दुपारी ४ वाजता सेलिब्रेशन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे आयोजित केलेला आहे, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा लॉ. परवीन भामानी अध्यक्ष, लॉयंस क्लब गडचिरोली, कार्यक्रमाचे उद्घाटक मा राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक पोलिस योद्धा न्युज नेटवर्क, प्रमुख अतिथी लॉ. प्रा. शेषराव येलेकर, झोन चेअर पर्सन, लॉ. प्रा. संध्या येलेकर, माजी अध्यक्षा लॉयंस क्लब गडचिरोली, लॉ. मंजुषा मोरे, सचिव, लॉयंस क्लब गडचिरोली, लॉ. महेश बोरेवार, कोषाध्यक्ष, लॉयंस क्लब गडचिरोली राहणार असून लॉयंस क्लब गडचिरोली तसेच पोलिस योद्धा न्युज नेटवर्क यांना उपस्थित राहण्याची विनंती माननिय विदर्भ चीफ ब्यूरो प्रा. शेषराव येलेकर पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क यांनी केली आहे.