लायन्स क्लब गडचिरोली प्लॅटिनम अवार्ड ने सन्मानित
लायन्स क्लब गडचिरोली प्लॅटिनम अवार्ड ने सन्मानित 
नुकताच लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 32 34 एच 1, च्या वतीने तुली इंटरनॅशनल नागपूर येथे ऑक्टोंबर सेवा सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लायन्स क्लबांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यात प्रांत 3234 एच 1 मध्ये ऑक्टोंबर सेवा सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब गडचिरोलीला प्लॅटिनम अवार्ड या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले. तसेच हा क्लब अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील कार्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार तसेच प्रांताचा ग्लोबल स्टार अवार्ड इत्यादी पुरस्कारांचा सुद्धा तो मानकरी ठरला.
प्रांत 32 34 एच 1 चे प्रांतपाल राजेंद्र सिंग बग्गा, उपप्रांतपाल श्रवण कुमार, बलबीरसिंग वीज, माजी प्रांतपाल एड. संदीप खंडेलवाल, विनोद वर्मा,जीवनचंद्र निर्वाण, डॉ. विनोद अदलखिया, सेवा सप्ताह अध्यक्ष डॉ. रिपल राणे, इत्यादींच्या हस्ते लायन्स क्लब गडचिरोलीला सदर तिन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यावेळी झोन चेअर पर्सन शेषराव येलेकर, लायन्स क्लब च्या अध्यक्षा लॉ परविन भामानी, सचिव मंजुषा मोरे , कोषाध्यक्ष महेश बोरेवार, प्रांतीय अधिकारी नादिर भामानी, उपाध्यक्ष सतीश पवार माजी अध्यक्षा प्रा. संध्या येलेकर इत्यादी उपस्थित होते.
ऑक्टोंबर सेवा सप्ताह 2 ते 8 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत लायन्स क्लब गडचिरोली ने शांतता पोस्टर स्पर्धा, आरोग्य निदान व उपचार शिबिर, स्वच्छता शिबिर, दंत चिकित्सा व बालकांमधील कर्करोग जनजागृती शिबिर, महिला रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी व जनजागृती शिबिर, महिला सबलीकरण अंतर्गत तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबविले होते.
प्रा शेषराव येलेकर
विदर्भ न्यूज ब्यूरो
