लायन्स क्लब गडचिरोली आणि लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच मधुमेह तपासणी शिबिर
लॉयन्स क्लब गडचिरोली आणि लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 नोव्हेंबर 2021, रोज शनिवारला विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली येथे मोफत “मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर”, “भव्य मधुमेह तपासणी शिबिर”तसेच “सामान्य आरोग्य तपासणी शिबिर” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी जनतेने या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान लायन्स क्लबच्या वतीने करण्यात येत आहे. येताना सोबत आधार कार्ड/रेशन कार्ड,मतदान पत्र ह्यापैकी कोणतेही एक ओळख पत्राचे झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे.*
शिबिरामध्ये सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथिल नेत्रविभागातील तज्ञ चमू विनामुल्य मोतीबिंदू, डोळ्याची तपासणी करतील. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्या रुग्णांना गडचिरोली ते सेवाग्राम नेण्याची व वापस आणण्याची सेवा लॉयन्स आय हॉस्पिटल सेवाग्राम बस ने मोफत करण्यात येईल. शस्त्रकिया झालेल्या रुग्णांना निवास,भोजन व औषधे विनामुल्य पुरविण्यात येईल. रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी जाण्याच्या तयारीने यावे.सोबत गरम कपडे,ताट, वाटी,ग्लास व मंजनआणावे.सदर शिबिरात नोंदणी करण्यासाठी लॉ. सतीश पवार(9420754575), लॉ.शेषराव येलेकर(9552331511), लॉ. महेश बोरेवार (9850055481),लॉ. देवानंद कामडी,(9421735519), लॉ.सुरेश लडके( 9422153546), लॉ. मदत जिवाणी (8806794567) यांच्याशी संपर्क साधावा.
शेषराव येलेकर
विदर्भ चीफ ब्यूरो न्यूज नेटवर्क