महाराष्ट्र लातूर हेडलाइन

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. शिवाजी काळगे विजयी

Summary

लातूर, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी […]

लातूर, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे पार पडली. मतदान यंत्रावरील मत मोजणीच्या २८ फेऱ्या आणि टपाली मतमोजणीची एक फेरी झाली. यामध्ये डॉ. काळगे यांना सर्वाधिक ६ लाख ९ हजार २१ मते मिळाली. तसेच भारतीय जनता पार्टीचे सुधाकर तुकाराम श्रंगारे यांना ५ लाख ४७ हजार १४० मते मिळाली. त्यामुळे डॉ. काळगे हे ६१ हजार ८८१ मताधिक्याने विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *