क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

लाखांदूरमध्ये पोलिसांचा सापळा यशस्वी! मोटरसायकलवरून अवैध देशी दारूची वाहतूक उघड

Summary

लाखांदूर : तालुक्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या मोटरसायकलला रंगेहात पकडले. विरली (बु.) मार्गावर रचलेल्या सापळ्यात ही कारवाई पार पडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे लाखांदूर पोलीस स्टेशनच्या पथकाने […]

लाखांदूर : तालुक्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या मोटरसायकलला रंगेहात पकडले. विरली (बु.) मार्गावर रचलेल्या सापळ्यात ही कारवाई पार पडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे लाखांदूर पोलीस स्टेशनच्या पथकाने नाकाबंदी केली होती. संशयास्पद मोटरसायकल थांबवून झडती घेतली असता, वाहनात देशी दारूचे तब्बल ४० टिल्लू आढळून आले. पोलिसांनी तत्काळ दारूसाठा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईत अंदाजे ९० हजार रुपये किमतीची मोटरसायकल व सुमारे ४ हजार रुपयांचा दारूसाठा, असा एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नरेश गभने (वय ४५, रा. धामनी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. “तालुक्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहतील,” असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
या कारवाईनंतर अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लाखांदूर पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *