लाखनी पोलिसांचा ‘ग्रीन’ धडाका! जॉन डिअर ट्रॅक्टरसह रेती तस्कर जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त कनेरी-दगडी परिसरात मध्यरात्री ‘फिल्मी’ सापळा; अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!
लाखनी (भंडारा):
जिल्ह्यात रेती माफियांनी कितीही लपून-छपून काम केले तरी ‘खाकी’ची नजर चुकवणे अशक्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लाखनी ते पालांदूर रोडवरील कनेरी-दगडी परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका विना क्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या जॉन डिअर ट्रॅक्टरसह रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमका थरार काय?
दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास, लाखनी पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना एका संशयास्पद ट्रॅक्टरची माहिती मिळाली. बाबा इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्कशॉपसमोर सापळा रचून पोलिसांनी एका हिरव्या रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला घेराव घातला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये अवैधपणे उपसा केलेली रेती भरलेली आढळून आली.
आरोपी आणि मुद्देमाल
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. प्रदिप काशीनाथ गोंधळे (वय २५, चालक, रा. मैढा-भुगाव)
२. निखील जेटमल चैथे (वय ३२, मालक, रा. मैढा-भुगाव)
जप्त केलेला मुद्देमाल:
जॉन डिअर ट्रॅक्टर (मॉडल ५०३९ डी): किंमत ७,००,००० रुपये.
निळ्या रंगाची जुनी ट्रॉली: किंमत १,००,००० रुपये.
१ ब्रास रेती: किंमत ६,००० रुपये.
एकूण मुद्देमाल: ८,०६,००० रुपये.
गुन्हा दाखल, तपासाची चक्रे वेगात!
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार वच्छला सुखदेव चाचेरे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रभा कुलसुंगे अत्यंत बारकाईने करत आहेत.
पोलीस योद्धा न्यूज अलर्ट: शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणाऱ्या रेती चोरांविरुद्ध लाखनी पोलिसांनी पुकारलेले हे युद्ध यापुढेही सुरूच राहणार आहे.
ब्युरो रिपोर्ट: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com
