BREAKING NEWS:
आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

Summary

मुंबई, दि. २६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर […]

मुंबई, दि. २६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *