लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
Summary
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपुर :- जिल्ह्यात ऐकीकडे दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे हवादील तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटाका बसला आहे. अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले […]

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपुर :- जिल्ह्यात ऐकीकडे दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे हवादील तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटाका बसला आहे. अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले पिक पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामधून कसे बाहेर पडावे हा प्रश्न शेतकाऱ्यांसमोर आहे.
अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आत्महत्या केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथे वैभव अरुण फरकडे (25) वर्षीय तरुण शेतकरीयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चेक पिपरी येथील महेश भास्कर मारकवार (34) वर्षीय शेतकरीयांनी विषारी औषध प्राशन करत ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला.
तरुण शेतकऱ्यांनी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिसऱ्या एका घटनेत, गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथील बंडू रामटेके यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मृत रामटेके यांच्या सोयाबीनच्या ढिगाला आग लागल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.