नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

रोडरोमिओंना धडा शिकविण्यासाठी गरज

Summary

काटोल/कोंढाळी -वार्ताहर ग्रामीण/शहरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना व टपोरींना शाळा/हायस्कूल /महाविद्यालय, तसेच बसस्थानक परिसरात पोलीस प्रशासनासह, नागरिकांनीही मुलींना त्रास देणाऱ्या /छेड काढणाऱ्या रोडरोमीयों/टपोरिंचा बंदोबस्त करावा . ग्रामीण भागातून शहरी/निम शहरी भागातील हायस्कूल/कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. या दरम्यान […]

काटोल/कोंढाळी -वार्ताहर
ग्रामीण/शहरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना व टपोरींना शाळा/हायस्कूल /महाविद्यालय, तसेच बसस्थानक परिसरात पोलीस प्रशासनासह, नागरिकांनीही मुलींना त्रास देणाऱ्या /छेड काढणाऱ्या रोडरोमीयों/टपोरिंचा बंदोबस्त करावा . ग्रामीण भागातून शहरी/निम शहरी भागातील हायस्कूल/कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. या दरम्यान बस स्थानकावर ते शाळा/हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन मार्गावर तसेच कोंढाळी येथील बस स्थानकाचे समोरील तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सामोरील उडानपुला खाली शाळां हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय सुरू होतांना व शाळां हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय सुटल्यावर या उडानपुला खाली टपोरी/रोडरोमीयोंचे टोळके दुचाकीने घिरट्या घालत असतात.
त्याच प्रमाणे काटोल बस स्थानकावर सुद्धा टपोरींचे टोळके दुचाकीने घिरट्या घालत असतात.
या रोडरोमीयों टोळक्यावर आवर घालण्यासाठी पोलीसा सोबत स्थानिक जनप्रतिनिधी व नागरिकांनी गावो गावचे पोलीस पाटील यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी मागणी केली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मुलींना मानसिक त्रास देण्याचे घटनां घडतात मात्र या प्रकरणी शाळेकरी विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नसतात , याचा फायदा रोडरोमीयों उचलतात.
या करिता शाळां, हायस्कूल,कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयात जाऊन
मुलींना स्वरक्षणासंबधी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यात रस्त्यावर कुणी छेड काढल्यास, किंवा त्रास दिल्यास त्यांना चोप देण्यासाठी दामिनी पथकाद्वारे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात यावे असी पालक वर्गाकडून आवाहनही करण्यात आले आहे

काटोल/कोंढाळी शहरात विविध शैक्षणिक संस्था, कृषी, तंत्रनिकेतन, अशी अनेक विद्यालये आहेत. या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी येथे येतात. शहरात सकाळच्या वेळी विविध क्लासेस, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांनीची लगबग सुरू असते. या दरम्यान, रोडरोमिओ या परिसरात रस्त्यावर दुचाकी भरधाव वेगाने चालवतात, सतत हेलपाटे मारत मुलींची छेड काढत असतात. मात्र, या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्या पोलीसांनी योग्य ती‌ कार्यवाही करण्यात यावी अशीही पालकांनी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *