हेडलाइन

रोटरी नागपूर एन्क्लेव्ह आयोजित शरीर रचना विश्लेषण शिबीर

Summary

रोटरी नागपूर एन्क्लेव्ह आयोजित शरीर रचना विश्लेषण शिबीर   बॉडी फिट तो सबकुछ हिट डॉ. जूगल चिरानिया रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीनसिटी आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शरीर रचना विश्लेषण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या […]

रोटरी नागपूर एन्क्लेव्ह आयोजित शरीर रचना विश्लेषण शिबीर

 

बॉडी फिट तो सबकुछ हिट

डॉ. जूगल चिरानिया

रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीनसिटी आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शरीर रचना विश्लेषण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या नुकत्याच संपन्न झालेल्या शिबिरात अकोला येथील नेत्ररोग तज्ञ रोटरीयन डॉ. जूगल चिरानिया यांनी 2 दिवसात 175 व्यक्तींची यशस्वी तपासणी करून योग्य आणि मोफत मार्गदर्शन केले. यावेळी बी. पी., रक्त शर्करा, वजन, व्हीसरल फॅट,, चरबी, बी. एम. आर., बी. एम. आय., शारिरीक वय, मासपेशी इत्यादी तपासणी करण्यात आल्या. यावेळी डॉ. चिरानिया यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजाराचा धोका वाढतो त्यासाठी प्रथिने, हिरव्या पालेभाज्या आणि संतुलित आहार भरपूर घेणे तसेच व्यायाम अत्यंत आवश्यक असलेल्याचे सांगितले. तसेच सर्व सामान्यांना आपल्या शरीराची काळजी घेण्यास या कॅम्प द्वारे प्रवृत्त करणे हेच आमचे ध्येय आहे असे यावेळी सांगण्यात आले. रोटरी नागपूर एन्क्लेव्ह रोटरीयन किशोर राठी, राजेश व्यवहारे, रोटरी साऊथ ईस्ट चे अध्यक्ष रत्नाकर चिमोटे, रोटरी ग्रीन सिटी च्या अध्यक्षा डॉ. शारदा रोशनखेडे यांचे शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान लाभले.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

पोलिस योद्धा न्यूज

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *