रोजंदारी मजदुर सेनेने अखेर कामगारांना न्याय मिळवून दिलाच!

*सदानंद देवगडे*:-* मेसर्स CRESENT ENTERPRISES सी एस टी पी एस चंद्रपूर प्रो. प्रा. हसन बुखारी या कंत्राट मध्ये काम करणारे पाच ( ५ ) कामगार गेल्या चार (४) महिन्यांपासून टेंडर संपला असता कामावरून बंद होते. रोजंदारी मजदुर सेनेला या सर्व कामगाराची तक्रार प्राप्त झाली असता लगेच संघटनेने पत्रक काढून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासना सोबत मीटिंग घेऊन टेंडर ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर संघटनेच्या दबावामुळे प्रशासनाला नमावे लागले.आणि दी २७/०३/२०२३ ला पाच कामगारांचे काम पूर्ववत सुरू झाले या प्रसंगी कामगारांनी संघटनेच्या कार्याची सरहाणा करून पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले याप्रसंगी मा.संजय निरंजने कायदेविषक सल्लागार रो. म.से. चंद्रपूर, मा. भाई सुभाष सिंग बावरे सर केंद्रिय प्रभारी, मा. भाई सदानंद देवगडे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, मा.भाई विवेकानंद मेश्राम शाखा अध्यक्ष सी टी पी एस चंद्रपूर, मा.भाई दीपक बेलगे जिल्हा उपाध्यक्ष, मा.भाई देवचंद गणवीर, मा.भाई सुधाकर मोंडे शाखा संघटक , मा.भाई शैलेश बोरकर प्रसिध्दी प्रमुख, आणि कामगार बांधव उपस्थित होते.