रेहान इंटरप्राजेश येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
Summary
प्रतिनिधी:- लाखांदूर तालुक्यातील मौजा चिचाळ येथील रोशन फुले समाजकार्य यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास समाजातील विविध घटकांतील नागरिक, युवक-युवती तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व […]
प्रतिनिधी:- लाखांदूर तालुक्यातील मौजा चिचाळ येथील रोशन फुले समाजकार्य यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास समाजातील विविध घटकांतील नागरिक, युवक-युवती तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना व महापुरुषांचा जयघोष करण्यात आले. समाजात एकता, समानता आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
रोशन फुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून, सामाजिक परिवर्तन आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म घडविणारा दिवस आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात प्रबोधनाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सतत सुरू ठेवले जाईल.
कार्यक्रमाचे संचालन राहुल राऊत यांनी केले, या कार्यक्रमास कन्हैया जांभुळकर, टीकेस जनबंधू, विलास मेश्राम पत्रकार, गणेश सोनपिंपळे पत्रकार, गोपाल झोडे, प्रभाकर शहारे, सौरभ नंदेश्वर, बळीराम पडारे, किशोर सतीमेश्राम, उमेश कांबळे, चंदू बावणे, वैभव मेश्राम सर, प्रणय मेश्राम, मुनेश्वर कराळे, इंद्रजीत समरीत, शिवम , सुधीर गडपायले,रसिका कोचे, श्वासने जनबंधू, पूजा फुले, सुनंदा दाणे, उषा चोपकर, टेभुणे,कौसल्या घरडे, सुकेहानी जनबंधू, शितल भैसारे,त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,शेवटी उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात.
