रेल्वे पोलिसांच्या सहाय्यक निरीक्षकासह २ कर्मचार्यांवर लाच प्रकरणी गुन्हा
Summary
परभणी : अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत आणि गंगाखेड येथील रेल्वेस्थानकावरील कँन्टीन चालवू देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणार्या परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह लाच स्वीकारणार्या दोघा पोलिस कर्मचार्यांवर परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे […]
परभणी : अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत आणि गंगाखेड येथील रेल्वेस्थानकावरील कँन्टीन चालवू देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणार्या परळी येथील रेल्वे पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह लाच स्वीकारणार्या दोघा पोलिस कर्मचार्यांवर परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गंगाखेड पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू होती.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्यासह पोलिस निरीक्षक अमोल कडू यांची तक्रारदाराने भेट घेतली. परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंढे यांच्यासह तेथील कर्मचारी संजय भेंडेकर, प्रेमदास पवार हे आपल्यावर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीचा अर्ज मागे घ्यावयास व गंगाखेड रेल्वेस्थानकात असलेले कँटीन चालवू ठेवण्यासाठी मदत करू. त्यासाठी एक लाख रुपये दे, अशी मागणी केल्याचे म्हटले.
या तक्रारीच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सापळा रचला. त्यावेळी दोघे पोलिस कर्मचारी पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेले. त्यावेळी संजय भेंडेकर याने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्या पाठोपाठ घटनास्थळावरून पोबारा केला. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडे या लाच स्वीकारताना घटनास्थळी आल्या नाहीत, परंतु त्यांनी पडताळणी दरम्यान लाच मागीतल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991