क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

रेती चोरी, गैरकायद्याच्या मंडळींच्या मारहाणीच्या घटना, हिसकावून चोरी, अंमली पदार्थ जप्ती, तसेच तीन मर्ग नोंद

Summary

भंडारा, दि. 7 नोव्हेंबर – भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यवाहीत रेती चोरी, मारहाण, अंमली पदार्थ ताब्यात घेणे आणि अपघाती मृत्यू (मर्ग) अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार — — रेती चोरी – तुमसर पोलिसांची कारवाई […]

भंडारा, दि. 7 नोव्हेंबर – भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यवाहीत रेती चोरी, मारहाण, अंमली पदार्थ ताब्यात घेणे आणि अपघाती मृत्यू (मर्ग) अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार —

रेती चोरी – तुमसर पोलिसांची कारवाई

दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी मौजा नवरगाव शिवार येथे बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणाऱ्या जितेंद्र सुरेश मारबते (रा. उमरवाडा) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून स्वराज 735 ट्रॅक्टर (क्र. डभ-36/स्-6026) व ट्रॉली (क्र. डभ-36/स्-6066) मिळून आली असून, एकूण ₹7,06,000 किमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्र. 724/2025 नोंदवण्यात आला असून तपास सपोनी साखरे करीत आहेत.

गैरकायद्यांची मंडळी – अडयाळ पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणे

पहिल्या प्रकरणात, फिर्यादी वैभव जगनाडे (रा. मकरधोकळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विनोद वंजारी (रा. मौदी पुनर्वसन) व त्याच्या साथीदारांनी रोडरोलरच्या वादातून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा क्र. 332/2025 नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात उलट फिर्यादी विनोद वंजारी यांनीच वैभव जगनाडे यांच्यावर व त्याच्या साथीदारांवर मारहाण आणि जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोप केला असून, गुन्हा क्र. 333/2025 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोउपनि चव्हाण करत आहेत.

हिसकावून चोरी – अडयाळ पोलीसांची तत्पर कारवाई

मौजा वडद पुन येथे राहणाऱ्या ८७ वर्षीय मुखरन विठोबा मलोडे या वृद्ध महिलेकडून आरोपी विजय नारायणराव पांगुल (रा. नागपूर) याने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून ₹60,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. या घटनेत फिर्यादींच्या गळ्याला इजा झाली असून, गुन्हा क्र. 334/2025 नोंदवून तपास पो. हवा. डेकाटे करीत आहेत.

अंमली पदार्थ विरोधी कारवाई – भंडारा पोलीस ठाण्याची धडक झडती

गौतम बुद्ध वॉर्ड, भंडारा येथे छापा टाकून शुभम सुभाष हापसे (वय 29) याच्याकडून 0.182 किलो गांजा (किंमत ₹2100) जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्र. 1519/2025 नोंदवला असून तपास सपोनी खदाडे करत आहेत.

मर्ग नोंदी – तीन मृत्यूंची नोंद

1. जवाहरनगर: दिलीप दुधराम हटवार (रा. परसोडी) यांचे प्रेत वैनगंगा नदीपात्रात आढळून आले. मर्ग क्र. 35/2025 नोंदवून तपास पोना विजय चाहुंदे करत आहेत.

2. सिहोरा: रोशन तुळसीदास येळे (रा. सिलेगाव) हा आपल्या शेतात मृत अवस्थेत आढळला. मर्ग क्र. 14/2025 नोंदवण्यात आला असून तपास म.पो.हवा. बांते करत आहेत.

3. साकोली: पुनम देवाजी मेश्राम (वय 17, रा. वलमाझरी) हिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मर्ग क्र. 67/2025 नोंदवून तपास म.पो.हवा. हर्षा मांढरे करीत आहेत.

 

भंडारा जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर कृत्यांवर सतत देखरेख ठेवत तत्परतेने कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपास अधिकारी संबंधित प्रकरणांवर पुढील तपास करीत आहेत.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *