BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

रेतीमाफियांचा रेती घाटांवर रात्रीबेरात्री डल्ला?? प्रशासकीय यंत्रणा बेकाम?

Summary

भंडारा प्रतिनिधी:- सर्व शबरी, रमाई व अन्य गरीब घरकुल लाभार्थ्यांना रेती घाटांवरून वाळू उपलब्ध करावी हे महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे परीपत्रक आहे. साकोली तालुक्यातील सर्रास रेतीमाफीयांनी रेती चोरीचा रात्रीबेरात्री सपाटा लावला आहे. मात्र गोरगरीब रमाई व शबरी घरकुल लाभार्थ्यांना आज बड्या […]

भंडारा प्रतिनिधी:- सर्व शबरी, रमाई व अन्य गरीब घरकुल लाभार्थ्यांना रेती घाटांवरून वाळू उपलब्ध करावी हे महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे परीपत्रक आहे. साकोली तालुक्यातील सर्रास रेतीमाफीयांनी रेती चोरीचा रात्रीबेरात्री सपाटा लावला आहे.
मात्र गोरगरीब रमाई व शबरी घरकुल लाभार्थ्यांना आज बड्या भावात रेती घेण्याची पाळी आली असल्याचे धक्कादायक चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली यांचे तहसिलदार यांना पत्र दिले अर्जानूसार घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करावी व आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
असा शासकीय मंत्रालय परीपत्रकही आहे. तरीही अजून पर्यंत अर्जदारास योग्य तो न्याय मिळाला नसून गोरगरीब शबरी व रमाई घरकुल लाभार्थ्यांना रेती घाटांवरून वाळू उपलब्ध नाहीच.
साकोली क्षेत्रातील परसोडी, बोंडे, खंडाळा व इतर रेतीघाटांवरून दररोज रात्रीला रेतीमाफीयांनी रेती चोरीचा सपाटा लावल्याने महसूलास चूना दररोज लागत आहे. याकडे मा. संदीप कदम जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेऊन कारवाईची मागणी समस्त घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *