रेतीची अवैधरित्या वाहतुक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉली पकडली
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड रेल्वे फाटक जवळ एम जी नगर येथे अवैध रेतीची वाहतुक करणारा टॅक्टर जात असतांना कन्हान तलाठी महेंन्द्र श्रीरसागर यांनी टैक्टर ला थांबवुन सखोल विचारपुस केली असता रेतीची अवैध वाहतुक करतांना मिळुन आल्याने पुर्ण कारवाई होई पर्यंत टॅक्टर ट्रॉली जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आली.
कन्हान परिसरात रेतीची बिना नंबर च्या टॅक्टर ट्रॉली व ट्रक व्दारे अवैधरित्या रेती चोरी सुरू असुन कन्हान पोलीस व महसुल विभागाचे अधिकारी, कर्म चारी मुंग गिळुन गप्प तर नाही ना अश्या चर्चेला उधा ण येत असल्याने सोमवार (दि.१८) ऑक्टोंबर २०२१ ला दुपारी १२:१५ वाजता दरम्यान ट्रॅक्टर क्र. एम एच ४० एल ८००९ हा तारसा रोड रेल्वे फाटक एम जी नगर कन्हान जवळ जात असताना कन्हान तलाठी हयानी ट्रॅक्टर ला थांबवुन विचारपुस केली असता विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतुक करीत अस तांना कन्हान पटवारी महेंन्द्र श्रीरसागर यांना मिळुन आल्याने त्यांनी टॅक्टर ला पकडुन जप्त करित तहसि लदार पारशिवनी यांच्या कार्यालयात जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) कारवाई करून आरोपी १) टैक्टर मालक अशोक पाठक २) चालक पुंडलिक रामाजी सुर्यवंशी राह. पिपरी यांचे विरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर प्रकरणाची कार्यवाही पुर्ण होई पर्यंत व पुढील आदेशा पर्यंत ट्रॅक्टर, ट्रॉली ही कन्हान पोलीसा च्या स्वाधिन करण्यात आली. ही कारवाई पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्श नात कन्हान तलाठी महेंन्द्र श्रीरसागर, कांद्री तलाठी संजय भोसले, टेकाडी तलाठी संकेत पांलादुरकर हयांनी यशस्विरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535