BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन

Summary

मुंबई, दि. 03 : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (“Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते […]

मुंबईदि. 03 : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी मे. टाटा इंटरनॅशनल अँड टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने (Re.Wi.Re) – ‘रिसायकल विथ रिस्पेक्ट’ या नावाच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ‘वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र’ (आरव्हीएसएफ) चे 30 नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते पुण्यात उद्घाटन केले. याप्रसंगी टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंघलटाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्राकार्यकारी संचालक गिरीश वाघ  उपस्थित होते.

या नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राची वर्षाला 25 हजार वाहनांची स्क्रॅपिंग क्षमता असणार आहे. यावेळी परिवहन आयुक्त श्री. भिमनवार म्हणाले कीटाटा इंटरनॅशनल व्हेईकल ॲप्लीकेशन्स सुरू करणे हा राज्यातील वाहन स्क्रॅपिंगचा व्यवसाय यशस्वी करण्याच्या प्रवासातील योगदानाचा आणखी एक मैलाचा दगड आहे. या सुविधा केंद्रात वाहनांच्या स्क्रॅपिंगची प्रक्रिया पर्यावरणपूरक व शासकीय नियमांचे पालन करणारी असेल. टाटा इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी सुविधा केंद्रात सर्व प्रकारच्या प्रवासी व व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग करण्यासाठी सुसज्ज असल्याचे सांगितले. 

 तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बत्रा यांनी वाहन स्क्रॅपिंगच्या उद्योगातून टीआयव्हीए आणि टाटा मोटर्सने देशातील वाहनांचे जीवनचक्र बदलविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे सांगत वाहनांच्या पुनर्वापराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर असल्याचे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *