BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

रिक्त पद भरतीसाठी बांद्रा भाभा रुग्णालयातील कामगार आक्रमक

Summary

पालिकेच्या बांद्रा भाभा रुग्णालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने व आता कंत्राटी कर्मचारीही उपलब्ध करुन दिले जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उपनगरीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदांच्या सापेक्ष घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपल्याने त्यांच्या नुतनीकरणाच्या फाईल वर अतिरिक्त आयुक्त […]

पालिकेच्या बांद्रा भाभा रुग्णालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने व आता कंत्राटी कर्मचारीही उपलब्ध करुन दिले जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. उपनगरीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदांच्या सापेक्ष घेण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपल्याने त्यांच्या नुतनीकरणाच्या फाईल वर अतिरिक्त आयुक्त डॉ. बिपिन शर्मा सही करीत नाहीत असे संबंधित रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक/ वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणने आहे.
कंत्राटी कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत तर अपुर्या कर्मचार्यांवर कामाचा ताण पडून त्यांची दमछाक होणार आहे त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या अडवणूकीचा निषेध करण्यासाठी बांद्रा भाभा रूग्णालयाप्रमाणे ईतर सर्व उपनगरीय रुग्णालयातील कर्मचारी आंदोलन करतील असे ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी सांगितले आहे.
उपनगरीय रूग्णालयातील रिक्त शेड्युल्ड पद भरती होत नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करणे, कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती देणे, ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणे आदी मागण्यांबाबत कामगार/ कर्मचारी आग्रही आहेत. या सर्व प्रश्नांबाबत सेना युनियनच्या सरचिटणीस ॲड. रचना अग्रवाल,चिटणीस वृषाली परुळेकर,संजय वाघ, महेश गुरव, रुग्णालय युनिट अध्यक्ष दिपक तळेकर, अरूण बाबर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *