BREAKING NEWS:
गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रीय हरित सेनेची निसर्गभ्रमंती

Summary

अर्जुनी मोर: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेने तर्फे दिनांक १ डिसेंबर 2024 ला निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पक्षी,कीटक,वनस्पती त्यांचा जीवनक्रम,त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व, मानवास असलेले फायदे व त्यांचे जतन करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे हेतूने […]

अर्जुनी मोर: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेने तर्फे दिनांक १ डिसेंबर 2024 ला निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पक्षी,कीटक,वनस्पती त्यांचा जीवनक्रम,त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व, मानवास असलेले फायदे व त्यांचे जतन करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे हेतूने या भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. सदर भ्रमंती जैवविविधता उद्यान, त्या शेजारील तलाव, जंगल परिसर व कोसावाडी या ठिकाणी काढण्यात आली. सकाळी 7.30 वाजता पासून 10.00 वाजता पर्यंत विविध वनस्पती, कीटक व पक्षी यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यामध्ये बेहडा,ऑस्ट्रेलियन बाभूळ,खस,लाजरी,सरू,पळस इत्यादी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.तसेच शेकाट्या,कनई,ढोकरी,गाय बगळा इत्यादी पक्षी व जायंट वूड स्पायडरची माहिती सुद्धा देण्यात आली. त्यानंतर कोसावाडी येथील रेशीम केंद्रास भेट देऊन रेशीम किड्याचा जीवनक्रम ओंकार लांजेवार यांनी समजावून दिला. निसर्ग भ्रमंतीमध्ये वर्ग नववीच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी शिवचरण राघोर्ते,अमर वसाके,उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार व किरण पर्वते यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *