राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे दिनदर्शिका लोकार्पण माजी उपमहापौर, माननीय मनिषा ताई कोठे यांचे हस्ते

नागपुर; शिक्षणाशिवाय देशाच्या सर्व विनाविकास होऊ शकत नाही म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात सर्वात जास्त शिक्षण संस्थान निर्माण केल्या ते संसार सदस्य कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या कैवारी व खरी शिक्षण महर्षी होते म्हणून आपण सुद्धा भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे प्रतिपादन संजय निंबाळकर यांनी केले ते राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती व डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेच्या लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षपदी माननीय परमेश्वर जी राऊत शहराध्यक्ष ओबीसी महासंघ प्रमुख अतिथी म्हणून माननीय शेख अयाज अध्यक्ष पूर्व संजय निराधार योजना,मान, सूनीलजी कोठे,सामाजिक कार्यकर्ते,डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते होते तर नागपूर डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विनायक इंगळे गुरुजी जिल्हाध्यक्ष माजी प्राचार्य नंदलाल यादव जिल्हा प्रवक्त प्रमोद कडूकर विभागीय महिला संघटना हर्षा वाघमारे उपस्थित होते याप्रसंगी शांताराम जळते हर्षा वाघमारे व प्रमुख अतिथी योगेश कडू यांनी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर व शिक्षकांच्या आंदोलनावर प्रकाश टाकला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज गवखरे, जिल्हाध्यक्ष यांनी केले माजी प्राचार्य नंदलाल यादव यांनी तर संचालन विनोद चिकटे सचिव व आभार लोक्कोतम बुटले यांनी मानले याप्रसंगी विनोद चिकटे अविनाश श्रीखंडे, लोकोत्तम बुटले पत्रकार प्रमोद गाडगे , व जवाहर गुरुकुल इंगिल्स हायस्कूल चे प्राचार्य संजय रक्षीये, व विलास मांडवे उपस्थित होते.