राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करा -सुभाष जिरवणकर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी ————————————–
Summary
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन दरवर्षी ५सप्टेंबर २०२२ राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.दरवर्षी राज्यातील जवळपास १०४शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या शिक्षकांना १९८४च्या शासन निर्णयाप्रमाणे दोन जादा वेतनवाढी देण्यात […]
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन दरवर्षी ५सप्टेंबर २०२२ राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.दरवर्षी राज्यातील जवळपास १०४शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या शिक्षकांना १९८४च्या शासन निर्णयाप्रमाणे दोन जादा वेतनवाढी देण्यात येत होत्या परंतु २०१३-२०१४पासुन या शिक्षकांना देण्यात येणा-या जादा वेतनवाढी बंद करण्यात आल्यामुळे या शिक्षकांमध्ये असंतोष आहे.हया वेतनवाढी पुर्ववत सुरू करण्यात याव्यात म्हणुन सतत १०वर्षापासुन हे शिक्षक प्रयत्न करत आहेत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे अनेक शिक्षक न्यायल्यात गेले आहेत.न्यायाल्याने २०१३-२०१४च्या शिक्षकांना जादा वेतनवाढी मंजुर करण्यात याव्यात असा निर्णय दिला आहे तरीपण या शिक्षकांना जादा वेतनवाढी देण्याचा आदेश विभागाचे संचालक ,विभागीय उपसंचालक जिल्हयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी काढत नसल्याने हे शिक्षक प्रशासनाकडे पायपिट करून थकले आहेत.तसेच २०१४पासुन २०१८पर्यंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी या जादा वेतनासाठी न्याल्यात याचिका दाखल केलेल्या आहेत.राज्यातील जवळपास १००आमदार महोदयांनी आणि खासदार यांनी मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री , ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देऊन ,विधानसभा ,विधान परिषद यामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे.अर्थसंकल्पीय ,पावसाळी ,हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न तारांकित करण्यासाठी या शिक्षकांनी अनेक आमदार महोदयाकडे पाठपुरावा केला आहे.हा प्रश्न अधिवेशनात तारांकित होईल पण तरी सुद्धा या प्रश्नाकडे शासन लक्ष देणार का हे मात्र या शिक्षकांना पडलेला प्रश्न आहे.त्यामुळे या शिक्षकांनी स्वतंत्र संघटना स्थापन करून गेली दोन वर्षापासुन राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली सतत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री,प्रधान सचिव शालेय शिक्षण व ग्रामविकास विभाग यांच्याकडे प्रयत्न करत आहेत परंतु अद्यापही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुभाष यांच्या नेतृत्वाखाली माधव वायचाळ, सुनिल गुरव,बळीराम चापले,सुनिल नायक,जगन्नाथ पोटे, प्राजक्ता रणदिवे,माया गेडाम यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन व संबंधित प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.यामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या दोन जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे, कायमस्वरूपी ओळखपत्र देऊन रेल्वे व बस पास सवलत देणे, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या पदोन्नती मध्ये प्राधान्य देऊन या शिक्षकांसाठी २०%जागा राखीव ठेवणे.जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये या शिक्षकांचा संवर्ग एक मध्ये समावेश करणे,शासनाच्या विविध शासकिय समितीमध्ये सदस्य म्हणुन या शिक्षकांची नियुक्ती करणे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीध्ये या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी 2012च्या शासन निर्णयात तरतुद करून या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी यांना आदेशित करणे यासह आदि मागण्यांचे निवेदन दिले आहे.या निवेदनावर ग्रामविकास मंत्री यांनी सकारात्मक विचार करून राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सर्व मागण्यारास्त असुन त्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले आहे व दोन जादा वेतनवाढी देण्यासाठी निवेदनावर प्रधान सचिव यांना कार्यवाही करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.ग्रामविकास मंत्री यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आपले प्रश्न सुटतील अशी आशा प्रवल्लीत झाली असुन आपणास न्याय मिळेल या प्रतिक्षेत आता हे शिक्षक आहेत.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चॅनल