नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रीय महामार्ग जुनापाणी गावालगत अज्ञात वाहनाचे धडकेत अस्वल ठार/अस्वलीचा मृत्यू

Summary

कोंढाळी/काटोल २१जून चे पहाटेची घटना. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनापाणी गावालगत अंदाजे १० ते ११वर्ष वयोगटातील अस्वल महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अस्वलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी […]

कोंढाळी/काटोल
२१जून चे पहाटेची घटना.
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनापाणी गावालगत अंदाजे १० ते ११वर्ष वयोगटातील अस्वल महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अस्वलीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते आपल्या स्टाफ वनपाल आर एम सुर्यवंशी,वन रक्षक किशोर चन्ने, वनरक्षक नयना मेश्राम —सह वन कर्मचारी किशोर कुसळकर, पुंडलिक सरोदे घटणा स्थळी पोहचले.
ही घटना २१जून चे पहाटे अंदाज पाच वाजताचे दरम्यान झाली असावी असे सांगितले जाते.
वनपरिक्षेत्र अधिकारी कोंढाळी चे वनपरिक्षेत्र अधिकारी वन कर्मचारी यांनी घटना स्थळ पंचनामा करून व गावकऱ्यांचे सहकार्याने सहकार्याने मृत अस्वलीला शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. पुढिल तपास कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत.

हे अस्वल बहूतेक बोर अभयारण्यातून खापरी बारोकर जंगल क्षेत्रातून अहमदनगर उपवनात भागात जात असतांना महामार्ग ओलांडताना ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *