BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

Summary

मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गट क्र.149 मधील जमीन मालकीची असल्याचे अप्पर आयुक्त,पुणे यांचेकडे रिव्हिजन अर्ज दावा दाखल करून त्याचा निकाल बाजूने लावून घेण्याकरीता पुराभिलेख (पुणे) यांच्या नावे बनावट सहीचे लेखी म्हणणे सादर करून कोर्टाची व शेतकर्‍यांची फसवणूक करून त्या आधारे […]

मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गट क्र.149 मधील जमीन मालकीची असल्याचे अप्पर आयुक्त,पुणे यांचेकडे रिव्हिजन अर्ज दावा दाखल करून त्याचा निकाल बाजूने लावून घेण्याकरीता पुराभिलेख (पुणे) यांच्या नावे बनावट सहीचे लेखी म्हणणे सादर करून

कोर्टाची व शेतकर्‍यांची फसवणूक करून त्या आधारे मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जमीनीच्या मालकीचा अजब दावा करणारे अकिल अहंमद सय्यद काझी,मुजाहिद महंमद युसुफ काझी,शकिल अहंमद सय्यद अहमद काझी (रा.सिध्देश्वर पेठ काझी ऑफीस,सोलापूर) या तीघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश जी.एम.चरणकर यांनी पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी दिग्विजय मारुती वाकडे (वय 31 रा.मंगळवेढा) या शेतकर्‍याची  सोलापूर रोडलगत गट क्र. 149 मध्ये जमीन आहे.सदर जमीनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्र.166 रत्नागिरी-नागपूर हा गेला आहे.या रस्त्याच्या कामासाठी 16 आर जमीन संपादित झाली आहे.

त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अदयाप मिळालेला नाही. याबाबत फिर्यादीने चौकशी केली असता सदर जमिनीबाबत आरोपी अकिल अहंमद सय्यद काझी,मुजाहिद महंमद युसुफ काझी,शकिल अहंमद सय्यद अहमद काझी यांनी मालकी हक्क दाखविला असून त्याबाबत अप्पर आयुक्त पुणे यांचेकडे रिव्हीजन नं.662/13 अन्वये केस चालू असल्याची माहिती फिर्यादीस मिळाली.

फिर्यादीने अधिक माहिती घेतली असता मंगळवेढा येथील जमीन औरंगजेब बादशहाने 17 व्या शतकात त्यांचे पुर्वजांना इनाम दिल्या होत्या.त्यामुळे या जमिनीचे वारस असल्याचे दाखवून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयात दावा दाखल केला होता.

सदर केसमध्ये 145 शेतकर्‍यांना सामनेवाले करण्यात आले होते.अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्यांचा अर्ज फेटाळल्याने आरोपीनी अप्पर आयुक्त पुणे यांचेकडे दावा दाखल केला होता.त्या दाव्यामध्ये कोर्टाची दिशाभूल करण्याकरीता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दाव्यामधील 145 शेतकर्‍यांची नावे वगळून पाच शासकीय कार्यालयातील अधिकारी यांना पार्टी केले होते.

अप्पर आयुक्त पुणे यांच्याकडील दाखल केलेल्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लावून घेण्याकरीता संकलक कैलास पांडुरंग लोखंडे यांचे नावे बनावट सहीचे लेखी म्हणणे सादर करून कोर्टाची व फिर्यादीची तसेच इतर शेतकर्‍यांची फसवणूक करून मिळणार्‍या नुकसानभरपाईची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी वरील तीघा आरोपींना अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले.यावेळी तपासिक अंमलदारांनी इतर आरोपींचा शोध घेणे,तसेच आणखी बनावट कागदपत्रांचा शोध घेणे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने दि. 5 मार्चपर्यंत तीघा आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड.संतोष माने सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.धनंजय बनसोडे,आरोपीच्यावतीने अ‍ॅड.गणेश पवार आदीनी काम पाहिले.

आता सत्य बाहेर येईल…

काझी बंधुंना मंगळवेढा अटक केली आहे. ५तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आता सत्य बाहेर येईल. महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्यात कांहीं राजकीय नेते, मंगळवेढ्यापासून मुंबई पर्यंत बरेच अधिकारी, एजंट कार्यरत होते. २ वर्षापासून सुमारे ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.

५०००कोटी रुपयांचे तालुक्याचे नुकसान झाले आहे. या रकमेचे व्याज व वाढीव भरपाई रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्रातील हे रॅकेट उद्ध्वस्त करून  संबंधितांना तुरूंगात पाठविण्यासाठी
आम्ही प्रयत्नशील आहोत.- ॲड.नंदकुमार पवार.

सचिन सावंत मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *