नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद कोंढाळीची प्रणाली चव्हाण मुलींचे संघ कर्णधार राष्ट्रीय अंतिम स्पर्धेत महाराष्ट्र मुलीचा संघ उत्तरप्रदेश संघावर तर मुलांचे संघाने कर्नाटक संघाला नमविले(हरविले)

Summary

कोंढाळी :राष्ट्रीय डॉजबॉल सब ज्युनियर मुला-मुलींच्या स्पर्धा वाराणशी उत्तरप्रदेश येथे दिनांक 2 ते 5 नोव्हेबर दरम्यान सुरू आहे.यात मुलींचे संघाने उत्तरप्रदेश संघावर 5 गुणांनी तर मुलांचे संघाने कर्नाटक संघावर अंतिम सामन्यात 8 गुणांनी विजय मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद पटकावून […]

कोंढाळी :राष्ट्रीय डॉजबॉल सब ज्युनियर मुला-मुलींच्या स्पर्धा वाराणशी उत्तरप्रदेश येथे दिनांक 2 ते 5 नोव्हेबर दरम्यान सुरू आहे.यात मुलींचे संघाने उत्तरप्रदेश संघावर 5 गुणांनी तर मुलांचे संघाने कर्नाटक संघावर अंतिम सामन्यात 8 गुणांनी विजय मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद पटकावून महाराष्ट्रचे वर्चस्व कायम ठेवले आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र संघात विदर्भातील नागपूर व अमरावती येथील खेळाडुंचा समावेश असुन मुलींचे संघाचे कर्णधारपद नागपूर (कोंढाळी) येथील प्रणाली चव्हाण हिची निवड असून समीक्षा देशमुख हिचा सुद्धा संघात समावेश आहे.दोन्ही खेळाडू लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे.
संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी दाखविली सलामीचे लढतीत राजस्थान संघावर 14-4 स्कोअर करीत 10 गुणांनी विजय मिळविला त्यानंतर शुक्रवारचे पार पडलेल्या स्पर्धेत कर्नाटक व हरियाणा संघाला पराभूत करून अंतिम फेरीकडे आपले स्थान निश्चित केले होते.आज शनिवारला उपांत्य फेरी व अंतिम सामन्यात मुलामुलींचे संघ विजयी ठरल्याने महाराष्ट्र संघाचा दबदबा असल्याचे महा.असोसिएशनचे महासचिव डॉ हनुमंत लुंगे, राजेश जाधव ,रामदास सारसर यांनी विजयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या.
दोन्ही संघाला स्पर्धा पूर्व प्रशिक्षण संभाजीनगर येथे सराव शिबिर आयोजीत केले होते.
—————————-
राष्ट्रीय स्पर्धेतील राज्यातील अजिंक्य संघ
महाराष्ट्राचा मुलींचा संघ : प्रणाली चव्हाण (कर्णधार),वंसिका हमणे, माहेरुन्निसा शेख, अनुष्का डोंबाळे, पूर्वा गोर्डे, शिंदे, समीक्षा देशमुख, नंदिता नांदूरकर, प्रणाली काळे, कादंबरी खैरे, प्रणाली जगदाळे, शरयू माने.प्रशिक्षक शरद बढे, व्यवस्थापक कोमल गहलोद तर,

महाराष्ट्राचा मुलांचा संघ : कृष्णा चौधरी (कर्णधार), ओम सपकाळ, अमन शेख, सोहम जाधव, तेजस राऊत, शाम दहीकर, जय दणके, यशराज साळुंखे, अश्वराज आटपाडकर, अथर्व कापडे, पुरुषोत्तम काळमेघ, ताहीर बोकाणे. प्रशिक्षक आशिष जगताप, व्यवस्थापक शरद बड़े यांचा समावेश आहे.
———– —-/
मुलींचे संघात नागपूरचे 2 खेळाडू
जिल्ह्यातील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी येथील डॉजबॉल पटू प्रणाली चव्हाण व समीक्षा देशमुख संघातील उत्कृष्ठ खेळाडू असून मागील वर्षी क्रीडा व युवक संचलनालय पुणे द्वारा आयोजित शालेय राष्ट्रीय स्पर्धेत निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेशजी राठी, सचिव डॉ श्यामसुंदरजी लद्धड, उपाध्यक्ष रेखा राठी, कोषाध्यक्ष मधुसूदनजी राठी,संचालक राहुल लद्धड, प्राचार्य सुधीर बुटे, क्रीडा प्रमुख हरीश राठी, प्रशिक्षक उज्ज्वल मोटघरे, भूषण राचलवार, सोहेल पठाण ,पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
——–/——-
महाराष्ट्र संघ राष्ट्रीय विजेता ठरल्याने राष्ट्रीय महासचिव डॉ बरार दिल्ली, राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ हनुमंत लुंगे अमरावती,उपाध्यक्ष राजेश जाधव जळगाव,डॉ हरिष;काळे ,सयाजी तिरमके, , निलेश भगत, कैलास करवंदे, अतुल पडोळे,श्रीकांत देशमुख, नागपूर असोसिएशन जिल्हा सचिव सुधीर बुटे आदींनी राष्ट्रीय विजेता महाराष्ट्र संघ व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *