राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनास पाठिंबा
Summary
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनास पाठिंबा महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेने उभारलेल्या आंदोलनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संपूर्ण पाठिंबा राज्यातील अकृषी विद्यापीठे व शासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मागील काही दिवसापासून संघटनेचे आंदोलन […]
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आंदोलनास पाठिंबा
महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेने उभारलेल्या आंदोलनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संपूर्ण पाठिंबा
राज्यातील अकृषी विद्यापीठे व शासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मागील काही दिवसापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे, आपल्या रास्त मागण्यांसाठी संघटनेने उभारलेले आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
मागील तीन वर्षापासून अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर अनेक मागण्या प्रलंबित असून शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये
१) सातवा वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी लवकरात लवकर देण्यात यावी .
२) सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे
३) पाच दिवसांचा आठवडा लागू करणे
४) पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदाचे निवृत्ती वेतन मिळणे
५) गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एकस्तर पदोन्नती योजना लागू करणे
६) 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
इत्यादी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे वरील सर्व मागण्या रास्त असून शासनाने सदर मागण्यांकडे त्वरित लक्ष घालून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. संघटनेने उभारलेल्या लढयाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
शासनाने सदर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शासनाला दिला आहे.
पाठिंब्याचे पत्र देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, जिल्हा संघटक चंद्रकांत शिवणकर व भास्कर मस्के उपस्थित होते.
प्रा शेषराव येलेकर
विदर्भ चीफ न्यूज ब्यूरो