BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई शिक्षण हेडलाइन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर

Summary

मुंबई, दि. 29 : घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध […]

मुंबई, दि. 29 : घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे २३ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत १६ एप्रिल २०२१ रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची ही संबंधित मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *