हेडलाइन

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा

Summary

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा   कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी विभागांतर्गत नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२१-२२ भात पिक प्रात्यक्षिक व्दारे शेतक-यांना मार्गदर्शन करून शेती दिन साजरा करण्यात आला. नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा […]

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा

 

कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी विभागांतर्गत नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२१-२२ भात पिक प्रात्यक्षिक व्दारे शेतक-यांना मार्गदर्शन करून शेती दिन साजरा करण्यात आला.

नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभि यान सन २०२१-२२ धान पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतीदिन घेण्यात आला. याप्रसंगी मा. तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी.गच्‍चे मॅडम यांनी उपस्थित शेतक री बांधवांना गहु लागवड तंत्रज्ञान तसेच हरभरा पिका वरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत मार्ग दर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री. वाघ साहेब यांनी कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थाप न व फरदड निर्मुलन बाबतीत मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक श्री देशमुख सर यांनी शास्त्रशुद्ध पद्ध तीने माती नमुना कशा पद्धतीने घ्यावा याबद्दल मार्ग दर्शन करून भात गट पिक प्रात्यक्षिका व्दारे शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी मा. ता.कृ.अ.डॉ. गच्‍चे मॅडम, मा.मं.कृ .अ.श्री. वाघ साहेब, कृ.प. श्री. कुबडे, कृ.स. देशमुख सर, ठोंबरे सर, झोड सर, राठोड मॅडम, गटकाळ मॅडम, ढंगारे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास पुरुष व महिला शेतकरी बांधवानी बहु संख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *