BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रवादी युवती कांग्रेस ची बैठक आज दिनांक २९-०९-२०२१ रोजी साकोली येथे संपन्न

Summary

प्रतिनिधी साकोली:- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पार्टी साकोली शहर व तालुक्याची महत्वपूर्ण बैठक दि. २९/०९/२०२१ सौ. सरिता ताईफुंडे यांच्या घरी, प्रगती कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रदेश उपाध्यक्ष तसेच मावळणी उपसरपंच मनीषा ताई काटे, विदर्भ विभागीय […]

प्रतिनिधी साकोली:- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पार्टी साकोली शहर व तालुक्याची महत्वपूर्ण बैठक दि. २९/०९/२०२१ सौ. सरिता ताईफुंडे यांच्या घरी, प्रगती कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रदेश उपाध्यक्ष तसेच मावळणी उपसरपंच मनीषा ताई काटे, विदर्भ विभागीय अध्यक्ष ॲड. कु. मेघाताई रामगुंडे, सौ. सरिताताई फुंडे, युवती जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहाताई शेंडे उपस्थित राहून युवतींना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण व शहरी भागामध्ये पक्ष संघठन कसे वाढ़वता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या साकोली तालुकाध्यक्ष या पदावर कु. सिमरन रंगारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही संघटना आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांच्या संकल्पनेतून तरुणींना राजकिय मंच उपलब्ध व्हावा याकरीता तयार झाली असुन समाजातील तळागळातील युवती यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण करून आपली ओळख निर्माण केली पाहिजे, असे मार्गदर्शन मा. मनीषा ताई काटे यांनी केले, तर नागपूर विभागीय अध्यक्षा मेघाताई रामगुंडे यांनी ज्याप्रणाने युवती संघटना भंडारा मध्ये आ. प्रफुलभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे तर निश्चितच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार प्रत्येक घरा घरात पोहचून पक्ष प्रत्येक निवडणुकीत विजयी होईल, असे प्रांजळ मत व्यक्त केले.
यावेळी कु. स्वाती शिवणकर, कु. शितल ढेंगे, कु. ललिता वैरागडे, कु. पुनम शिवणकर, कु. छाया शिवणकर, कु. छब्बु रामटेके, कु. श्वेता शिवणकर, कु. प्राजक्ता गणवीर, कु. श्रद्धा बंसोड, कु. प्रगती रंगारी, कु. रोहिणी रंगारी, कु. पुजा हिवरे, कु. ऐश्वर्या घो, कु. प्राची खंडाईत, कु. अंजली नेवारे, कु. तन्वी समरीत, कु. सिद्धी वैद्य, कु. श्रुती कावळे, कु. रोहिणी हांडे, कु. प्रगती जनबंधू, कु. ज्योती कानेकर कु. माधुरी शहारे, कु. पूजा बघेल, कु. रुचिका निपाने, कु. पायल खवास, कु. तारा हेडाऊ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जुही राऊत तर आभार व्यक्त कु. सिमरन रंगारी यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रभारी मा. नागबोधी गजभिये यांनी सांभाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *