राष्ट्रवादी युवती काँग्रेस, भंडारा च्या वतीने आज ६ नवंबर रोजी भाऊबीज त्योहार निमित्त गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन

⏰⏰⏰
राष्ट्रवादी युवती काँग्रेस, भंडारा च्या वतीने आदरणीय सुप्रिया ताई सुळे व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताई सलगर, यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊबीज या सणाच्या दिवशी गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी साहेबांना भाऊबीजीची ओवाळणी म्हणून गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी करावे, करीता त्यांच्या प्रतिमेला ओवाळून ओक्षण करण्यात आले आणि ओवाळणी म्हूणन भारतातील बहिणींना महागाई कमी करावी, गॅस पेट्रोल डिझेल यांचे दर कमी करावे हीच ओवाळणी मागण्यात आली, यावेळी युवती जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहा शेंडे, शहर अध्यक्ष डॉ. कु. पौर्णिमा वाहाने, कीर्ती बोरकर, कीर्ती रगडे, पुण्यशीला कांबळे, दिपाली देशमुख, पल्लवी रोटकर, सिद्धी वैद्य, व युवती काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.
⏰⏰⏰