राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी भंडारा तर्फे ⚫ निषेध……निषेध……निषेध…..⚫

स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी
प्रतिनिधी तुमसर:- आपली संस्कृती महिलांचा मान सन्मान राखणारी आहे. परंतु, राजकिय पक्षातील काही नेते आपली मान-मर्यादा विसरून महीला बद्दल मनात येईल तशी अश्लील भाषा वापरून वक्तव्य करीत असतात.
दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे ” रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे ” अशी अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून महीला तसेच युवतींचा अपमान केला आहे, या वक्तव्यावर समस्त महिलाचां अवमान केल्याचा गुन्हा नोंद करून प्रवीण दरेकर यांचे वर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, या संदर्भात आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, जिल्हा भंडारा तर्फे पोलिस अधीक्षक साहेब, भंडारा यांना निवेदन देवुन जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहा शेंडे, शहराध्यक्ष डॉ. कु. पौर्णिमा वाहाणे, पल्लवी रोटकर, रितू पडवार, सौ. हर्षाताई वैद्य, रीना गजभिये, कु. सिध्दी अजय वैद्य, किर्ती बोरकर उपस्थित होते.