राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिवाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Summary
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिवाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर:- चंद्रपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना पैशासाठी धमकविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिवाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नयन साखरे असे या पदाधिकाऱ्याचे […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिवाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना पैशासाठी धमकविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर सचिवाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नयन साखरे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला ३५ हजार रुपये आरटीओकडून घेताना सायबर सेलच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महीणाभरापुर्वी दुचाकी चोरीचा आरोपात राष्ट्रवादीची महीला पदाधिकार्याला पोलीसांनी अटक केली होती.
साखरे याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला शहर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. पद मिळाल्यापासून त्याने येथील आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घालणे सुरु केले. अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणे. भ्रमणध्वनीवर चित्रीकरण करणे आदी त्यांचे उद्योग तो करायचा. तुमची वरिष्ठांकडे तक्रार करणार माध्यमांत बातम्या छापून आणणार, असाही तो दम भरायचा. हे सर्व थांबवायचे असेल तर पन्नास हजार रुपये महिना द्यावा लागेल, असा दम त्याने आरटीओ अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, साखरेच्या त्रासाला कंटाळून सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधिकक्षकांची भेट घेतली. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षकांनी याचा तपास सायबर सेलकडे दिला. दुसरीकडे अधिकाऱ्यांशी पन्नास हजार रुपये महिन्यावरून त्याच्या वाटाघाटी सुरुच होत्या. शेवटी ३५ हजार रुपये महिना देण्याचे ठरले. पहिला हप्ता घेण्यासाठी साखरे आज आरटीओ कार्यालयात आला. पैसे स्वीकारतानाच त्याला सायबर सेलच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरु होती.