राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव कन्हान ला थाटात

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव कन्हान ला थाटात
कन्हान : – मराठा सेवा संघ शाखा कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे कोविड-१९ चे प्रतिबंधक नियमाचे पालन करून राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करित कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ च्या जिवन शैली व मौलिक कार्यावर उपस्थिताना मान्यवरांनी मार्गदर्शन करून आपआपल्या घरोघरी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन करून मराठा सेवा संघ दिनदर्शिका २०२२ चे वितरण करण्यात आले. याप्रसं गी डॉ पजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा. शांताराम जळते, म रा से तालुकाध्यक्ष मोतीराम रहाटे, आर रहमान, राजुजी रेंघे, कमलसिंह यादव, राजेंद्र मसार, संभाजी ब्रिगेड कन्हाचे पवन माने, राकेश घोडमारे, अमोल डांगे, सुमित खैरकार, ऋृतिक रेंघे आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन जिजाऊ जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535