महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली

Summary

मुंबई, दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र […]

मुंबई, दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवन येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे उपसचिव नागनाथ थिटे, उमेश शिंदे, पुनम ढगे व अवर सचिव विजय कोमटवार, प्राजक्ता कुळकर्णी, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *