नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रनिर्माण आणि देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान मोलाचे – केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक

Summary

देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान  नाशिक दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासाच्या दृष्टीने देशात आमूलाग्र बदल घडून येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा प्रभाव […]

देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान 

नाशिक दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासाच्या दृष्टीने देशात आमूलाग्र बदल घडून येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा प्रभाव निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रनिर्माण आणि देशाला पुढे घेऊन जाण्यात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी काढले.

27 व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवात’ केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा विभागामार्फत देशसेवा तसेच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना तसेच स्वयंसेवी संस्थांना महायुवाग्राम हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय युवा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा मंत्रालय संचालिका विनिता सूद, अवर सचिव धर्मेंद्र यादव, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास धिवसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त देशात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने देशात राष्ट्री युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर महाराजांच्या नाशिकच्या या भूमीत महोत्सवानिमित्ताने मला यायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना युवकांप्रति अतिशय प्रेम आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना सन्मानित करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली होती. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच युवकांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले आहे. देशाप्रति सेवाभाव असणाऱ्या आणि समाजसेवेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 युवक आणि दोन संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान आज करण्यात येत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. देश सेवा आणि सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र काम करणाऱ्या युवकांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, असेही राज्यमंत्री श्री.प्रामाणिक म्हटले.

महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या या २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव देशातील युवकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात ‘विकसित भारत २०४७’ ही संकल्पना विकसित करण्यासाठी तसेच  ‘सक्षम युवा, समर्थ भारत’  या संकल्पनेतून देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातूमन शपथ घेऊया, असेही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी उपस्थित युवकांना आवाहन केले.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने या युवकांचा झाला सन्मान (वर्ष-2020-2021)

◼️अधि दैव (१७), गुरुग्राम, हरियाणा

◼️अंकित सिंह (२९), छत्तरपूर, मध्य प्रदेश

◼️बिसाठी भरत (२८), अनंतपुरम, आंध्र प्रदेश

◼️ केवल किशोरभाई पावरा (२७) बोटाद, गुजरात

◼️पल्लवी ठाकुर (२६), पठाणकोट, पंजाब

◼️प्रभात फोगाट (२५), झज्जर, हरियाणा

◼️राम बाबू शर्मा (२८), जयपूर, राजस्थान

◼️रोहित कुमार (२९), चंडीगड

◼️ साक्षी आनंद (२६), पाटणा, बिहार

◼️ सम्राट बसाक (२८), धलाई, त्रिपुरा

◼️सत्यदेव आर्य (३०), बरेली, उत्तर प्रदेश

◼️वैष्णवी श्याम गोतमारे (२६), अकोला, महाराष्ट्र

◼️विधी सुभाष पलसापुरे (२६), लातूर, महाराष्ट्र

◼️विनीशा उमाशंकर (१७), तिरुवन्नामलाई, तमिळनाडु

◼️विवेक परिहार, उधमपूर, जम्मू-कश्मीर

 

या स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने झाला सन्मान (वर्ष-2020-2021)

◼️शक्ती विकास बहुद्देशीय संस्था, नाशिक, महाराष्ट्र

◼️ युनिफाईड रूरल डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन, थौबल, मणिपूर

पुरस्काराचे स्वरुप :-

यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त युवकांना वैयक्तिक पुरस्कारात एक लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच युवक संस्था मध्ये तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *