BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

रामाळा तलावाच्या खोलीकरणासाठी प्रशासनाकडून प्रधानमंत्री खनिज विकास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडणार इको प्रो च्या अन्नत्याग सत्याग्रह स्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट

Summary

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभल असतांना गोंडकालीन रामाला तलाव म्हणजे चंद्रपूर महानगरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली सुंदर संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करने हे सामाजिक जबाबदारी असतांना इको प्रो च्या माध्यमातून या रामाळा तलावाचे खोलीकरण करून संवर्धन करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाकडे प्रशासनाने […]

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव लाभल असतांना गोंडकालीन रामाला तलाव म्हणजे चंद्रपूर महानगरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली सुंदर संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करने हे सामाजिक जबाबदारी असतांना इको प्रो च्या माध्यमातून या रामाळा तलावाचे खोलीकरण करून संवर्धन करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाकडे प्रशासनाने त्वरित दखल घेत खोलीकरणाचे कार्य हाती घ्यावे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. इको प्रो संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव येथे सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह स्थळी भेट प्रसंगी अहीर बोलत होते.
प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे, इतिहास संशोधक टी टी जुलमे, युवा नेते रघुवीर अहीर, भाजप जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष राजू घरोटे, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विनोद शेरेकी, गंगाधर कुंटावार, साईनाथ मास्टे, महेश अहीर, तुषार मोहुर्ले, राहुल बोरकर, यश ठाकरे, भूषण पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
इको प्रो ने मागण्यांना घेत सादर केलेल्या निवेदनाच्या आधारावर हंसराज अहीर यांनी संबंधित विभागाशी पत्राचार केला होता त्यावर आर्थिक वर्ष २०२१- २०२२ मध्ये पुरातत्व विभागामार्फत रामाळा तलावास लागून असलेल्या किल्ल्याच्या भिंतीचे संवर्धन करण्यासाठी अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून या अंदाजपत्रकात इको प्रो च्या सर्व मागण्यांचा सुद्धा सहभाग करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र हंसराज अहीर यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती अहीर यांनी यावेळी इको प्रो ला दिली.
रामाळा तलावाचे खोलीकरण व्हावे हि इको प्रो ची मागणी अतिशय रास्त असून त्यांच्या पाठपुरावाही यामध्ये महत्वपूर्ण आहे. जिल्हा प्रशासनाने हे चंद्रपूर चे वैभव टिकविण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. पालकमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री खनिज विकास निधी च्या माध्यमातून अथवा सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून हे खोलीकरणाचे काम प्रशासनामार्फत हाती घ्यावे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *