रामदेवबाबांच्या भक्तांनी आपल्या मुलामुलींना डाॕक्टर बनवू नये ! प्रेमकुमार बोके यांचा जबरदस्त टोला.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 27 मे 2021:-
भारत हा भावनाशील लोकांचा देश आहे.लोकांच्या या भावनिकतेचा फायदा घेवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारी काही स्वार्थी व ढोंगी मंडळी आपल्या देशात सतत कार्यरत असतात.जनता सुध्दा अशा लोकांच्या जाळ्यात सहजपणे अडकते.नंतर जेव्हा आपण मुर्ख बनविले गेलो आहे असे लोकांच्या लक्षात येते,तेव्हा खूप वेळ झालेला असतो व या नालायक लोकांनी तोपर्यंत आपले उखळ पांढरे करुन घेतलेले असते व देशाचे बरेच नुकसान केलेले असते.आसाराम,रामरहीम सारखी अशी बरीच उदाहरणे आपल्या देशात घडली आहेत.सध्या पतंजली प्राॕडक्टसचे मालक व्यापारी व उद्योगपती रामदेव (बाबा ?) हे सुध्दा अशीच अतार्किक,अवैज्ञानिक व असंस्कृत वक्तव्ये करून लोकांना जीवदान देणाऱ्या समस्त डाॕक्टर मंडळींचा अपमान व उपमर्द करण्यात धन्यता मानत आहे.ही अतिशय घृणास्पद बाब असून सध्याचे प्रगत व आधुनिक वैद्यकशास्त्र असलेल्या अॕलोपॕथिच्या डाॕक्टरांचा रामदेवबाबाने जो अवमान केला आहे त्याबद्दल रामदेवबाबांचा जाहीर निषेध.
अॕलोपॕथीला मूर्ख,तमाशा,बेकार आणि दिवाळखोर शास्त्र संबोधून व अॕलोपॕथीने कोरोना काळात लक्षावधी लोकांचा बळी घेतला असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन समस्त डाॕक्टरांच्या विश्वासार्हतेबद्दल रामदेवांनी शंका व संशय व्यक्त केला आहे.तसेच कोरोना महामारीच्या काळात लोकांमधे भ्रम आणि भीती निर्माण करुन भारताच्या आरोग्य विभागाची,कोरोना योध्यांची बदनामी व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत असे आरोग्यमंत्री डाॕ.हर्षवर्धन यांनी रामदेवांना स्पष्टपणे सुनावले आहे.रामदेवांचे हे वक्तव्य कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून असंंख्य लोकांना नवीन जीवन प्रदान करणाऱ्या डाॕक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारे असून त्यांना निराश व हतबल करणारे आहे.वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात धडाडीने काम करणाऱ्या लोकांना भारत सरकार व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी *कोरोना योध्दा* म्हणून घोषित केले आहे व त्यांच्यासाठी समस्त देशवासियांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे हा भारत सरकार व प्रधानमंत्र्यांचाही जाहीर अपमान आहे.त्यामुळेच *आयएमए* या डाॕक्टरांच्या संघटनेने रामदेवांना देशद्रोही घोषित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे.परंतु रामदेवबाबाची मग्रुरी इतकी वाढली आहे की,कोणाच्या बापाची मला अटक करण्याची हिंमत नाही असे म्हणत त्यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे.त्यामुळे डाॕक्टरांवर विश्वास असणाऱ्या समस्त भारतवासियांनी रामदेवबाबाच्या विरोधात आपला आवाज उठविणे आता गरजेचे आहे.
जगातील कोणतेही शास्त्र किंवा व्यक्ती १०० टक्के परफेक्ट नसते.विज्ञानावर चालणाऱ्या शास्त्रात दररोज सुधारणा व बदल होत असतात.पूर्वी पोट फाडून करावी लागणारी शस्त्रक्रिया आता छोटेशे छिद्र पाडून होते.त्यामुळे विज्ञान हे दररोज नवनवीन बदल घडवून आणणारे शास्त्र आहे व अॕलोपॕथी हे विज्ञानाला मानणारे शास्त्र आहे.परंतु रामदेवबाबांचा विज्ञानाला वेळोवेळी असणारा विरोध व अवैज्ञानिकतेचे समर्थन आपण अनेकदा पाहिले आहे.योगामुळे कॕन्सर सहित कोणताही आजार बरा करण्याचा दावा करणारे रामदेवबाबा आपल्या कार्यक्रमातून हळूवारपणे कशी औषधे विकायला लागले हे आंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्याही लक्षात आले नाही.हा माणूस बाबाचा व्यापारी कसा झाला हे मेंदू जाग्यावर असणाऱ्या लोकांना बरोबर माहित आहे.रामदेवबाबा तरी १०० टक्के परफेक्ट आहे का ? त्यांच्या अनेक प्राॕडक्टमधे गडबड आहे हे अनेकदा सिध्द झाले आहे व संसदेत खासदार वृंदा करात यांनी रामदेवबाबांच्या ओषधांचा घोटाळा पुराव्यानिशी मांडला आहे.तरीसुध्दा रामदेवबाबा डाॕक्टरांची टिंगलटवाळी करतात. *डाॕक्टर* हा शब्द अतिशय हिनकसपणे व उपरोधिकतेने उच्चारून लोकांच्या मनात डाॕक्टरांविषयी व्देष व घृणा निर्माण करण्याचे काम करतात.अॕलोपॕथीच्या डाॕक्टरांनी आता जाहीरपणे निर्णय घ्यायला पाहिजे की,रामदेवबाबा आणि त्यांच्या अवैज्ञानिक गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांना जर आता उपचाराची गरज पडली तर त्यांच्यावर आम्ही उपचार करणार नाही.रामदेवबाबांचा खास शिष्य बालकृष्ण दिल्लीच्या एम्स मधे अॕलोपॕथिचे उपचार घेतो आणि रामदेवबाबा अॕलोपॕथीच्या डाॕक्टरांची टिंगलटवाळी करतात यामधील गौडबंगाल समजून घेणे गरजेचे आहे.रामदेवबाबा भगवे वस्त्र परिधान करतात.भगवा रंग हा त्याग,समर्पण आणि सत्यतेचे प्रतीक आहे.भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या लोकांना स्वार्थ नसतो.मोहापासून ते अलिप्त असतात.परंतु इथे तर आरपार पैसे,मोह आणि स्वार्थामधे बुडालेला माणूस भगवे वस्त्र परिधान करुन व्यापार करतो,फसव्या औषधांच्या जाहीराती करतो व लोकांपासून बक्कळ पैसा उकळून हजारो कोटींचा उद्योगपती बनतो.स्वामी विवेकानंदांनी परिधान केलेल्या पवित्र अशा भगव्या रंगाचा हा अवमान आहे.रामदेव हे बाबा नसून समाजाला फसविणारे महाठग आहे.गोड गोड बोलून लोकांना लुबाडणारे लुटारू आहे.योगाच्या नावाखाली लोकांकडून कोट्यावधी रुपये उकळणारे ढोंगी गुरू आहे.डाॕक्टरांवर संशय घेणारे व जनतेला संभ्रमीत करणारे देशाचे शत्रू आहे.म्हणूनच रामदेवबाबांना देशद्रोही घोषित करण्याची प्रधानमंत्र्यांकडे डाॕक्टरांनी केलेली मागणी एकदम रास्त व योग्य आहे. कोरोनाची लस घेवूनही डाॕक्टर कसे काय मरण पावले व जे स्वतःंला वाचवू शकत नाही ते दुसऱ्यांना काय वाचविणार असा दुर्भाग्यपूर्ण प्रश्न विचारुन देशवासियांच्या मनात डाॕक्टरांविषयी शंका आणि राग निर्माण करण्याचे रामदेवबाबांचे हे कृत्य अतिशय भयानक,विकृत आणि खेदजनक आहे.हे कृत्य सरकारच्या कोरोनाविरोधी लढ्यात बाधा आणणारे व लसीकरणाच्या समस्त मोहिमेलाच उध्वस्त करणारे आहे.त्यामुळे अजूनही ज्या लोकांचा रामदेवबाबांवर विश्वास व श्रध्दा असेल त्यांनी आपल्या मुलामुलींना डाॕक्टर बनविण्याचे स्वप्न अजिबातही पाहू नये.तसेच रामदेवबाबांच्या ज्या भक्तांची मुलेमुली डाॕक्टर असतील त्यांनी ताबडतोब आपल्या मुलामुलींना डाॕक्टरकीचा व्यवसाय बंद करण्यास सांगावे.रामदेवबाबा विनाकारण आयुर्वेद व अॕलोपॕथी यामधे दरी निर्माण करण्याचे काम करीत आहे.आयुर्वेद ही रामदेवबाबांची मक्तेदारी नसून आमच्या महान पूर्वजांनी दिलेला तो उज्वल वारसा आहे व आम्हाला त्याचा अभिमान आहे.त्यामुळे आयुर्वेदाचा धंदा करणाऱ्या रामदेवबाबांनी लोकांना ज्ञान पाजणे बंद करावे. उच्चशिक्षित लोकांनीच रामदेवबाबासारख्या अनेक ढोंगी बुवा-बापूंना डोक्यावर घेतले आहे.अशा भावनिक व अंधश्रध्दाळू लोकांमुळेच भगव्या कपड्यांचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांचे फावते.रामदेवबाबांनी *राम* आणि *देव* या दोन्ही पवित्र शब्दांचा घोर अपमान केला आहे.त्यामुळे डाॕक्टरांवर विश्वास असणाऱ्या व डाॕक्टरांना देव मानणाऱ्या लोकांनी रामदेवबाबांच्या या देशद्रोही कृत्याचा जाहीरपणे विरोध करावा.तरच देशाला चुकीच्या दिशेने नेणाऱ्या लोकांचा आपण बंदोबस्त करु शकतो अशी स्पष्ट माहिती प्रेमकुमार बोके अंंजनगाव सुर्जी ९५२७९१२७०६
यांनी २७ मे २०२१ रोजी दिली.