रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी
रामजन्मभूमी मुक्त करून सर्वच हिंदू, अर्थात,Open,SC, ST,NT, VJ, SBC, OBC सूखी झालेत,गंगेत आंघोळ करून ६४ कोटी धार्मिक उन्माद असणारे पाप धुऊन मोक्ष प्राप्ती केली तसेच धार्मिक स्थळ मुक्त करून सर्वच बौध्द सर्व दृष्टीने लायक बनतील असे काही अतिधार्मिक नेते सांगत आहेत असे दिसते. साधू,सन्याशी वा संपूर्ण पुरुष बनन्याच्या शर्यतीत असणारे भिक्कू वाढवून समाजाच्या सामान्य माणसाचे आर्थिक वा सामाजिक परिवर्तन होईल का? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय,आर्थिक वा न्यायिक समानतेसाठी आयुष्य खर्ची घातल तसेच वैज्ञानिक दृष्टीने समाज प्रगत होऊन धार्मिक अंधश्रद्धा, जातीयता समाप्त करण्यासाठी बौद्ध धम्म अंगीकारला, अर्थात हिनयान, महायान, वज्रयाण, तंत्रयाण नाकारून जगाला नवयान दिले व प्रगत शिक्षण घेऊन आपला दर्जा बदलविण्याचा मौलिक संदेश दिला.आपल्या शैक्षणिक वा सामाजिक इतरही समस्या भरपूर आहेत त्या बाजूला सारून आपण मात्र अतिधार्मिक किचळात सामान्य माणसाला गुंतवून आपली काही मंडळी पोळी शेकत आहेत.वेळीचं सावध व्हा.अतिधार्मिक उन्मादापायी पुढच्यापिढ्या बरबाद करण्याचे कार्यक्रम आपल्या हातून होऊ नये ही अपेक्षा..धर्म वा धम्म कुठलाही असो अति धार्मिक उन्माद देशाला, संविधानाला वा व्यक्तिगत प्रगतीला घातक असतो, भारतीय संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य हे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य याच्या अधीन राहून सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचारण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत..धार्मिक प्रतिमाने बदल करून फार प्रगती होत नसते तर धार्मिक अंधश्रद्धा समाप्त करून वा पूजा अर्चना बंद करून Pragmatism व्यावहारिकतावाद, व्यवहारवाद, फलप्रामाण्यवाद, फलवाद आणि Humanism मानवतावाद कृतीत उतरविल्यास राष्ट्रवाद वा देश तथा व्यक्तीची सर्व स्तरावर नक्कीच प्रगती होईल ह्यांची जाणीव ठेऊन पुढे वाटचाल करावी ही नम्र सूचना.
Adv.Dr.Satyapal Katkar, Psychologist