रामगढ शिव गुफा व बहिरमबाबा देवस्थान येथे भव्य यात्रा
रामगढ शिव गुफा व बहिरमबाबा देवस्थान येथे भव्य यात्रा
दोन हजार वर्षे जुनी आहे रामगढ़ शिवगुफा
कोंढाळी-वार्ताहर- दुर्गाप्रसाद पांडे
भगवान शंकराची पूजा करणार्यांसाठी महाशिवरात्री चा दिवस महत्त्वाचा दिवस मानल्या जाते. जगभरातील शंकराचे भाविक आजच्या दिवशी शंकरजी ची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, दूध-पाण्याचा अभिषेक करतात. कोंढाळी लगतच्या बहिरमबाबा देवस्थान तसेच मासोद लगतच्या अति प्राचीन(दोन हाजार वर्ष जुनी वाकाटक द्वितीय कालिन) रामगढ शिव गुंफा येथील देवस्थाना मध्ये शंकराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त कोविड नियमानुसार कार्यक्रमाचे विषेश आयोजन केले गेले. माघ वद्य चतुर्दशी’ला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. या वर्षी हा व्रत मंगळवार 01मार्च रोजी होता. बुधवार दोन मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांमध्ये उत्साह असतो. व या दिवशी रामगढ़ शिवगुंफेच्या परिसरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .या व्रता प्रसंगी अनेकजण उपवास, पूजा, जागरण या प्रकारे हे व्रत करतात. महाशिवरात्र या शब्दाचा अर्थ ‘शिवाची महान रात्र’ असा होतो. महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण देशात असतो. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मासोद येथील रामगढ़ शिवगुफा तथा बहिरमबाबा देवस्थान कोंढाळी येथे हजारो शंकराचे भाविकांची अलोट गर्दी असते. दोन्ही देवस्थान संस्था कडून चोख व्यवस्था केली होती तसेच कोंढाळी पोलीसांचाही कडक बंदोबस्त होता.