राणी दुर्गावती कन्या रेंजर आणि गाईडने साजरा केला रक्षाबंधन.
स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील वीर झलकारी रेंजर पथक व राणी लक्ष्मीबाई गाईड पथक यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी 22 रेंजर व 32 गाईडने या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमासाठी गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री गोंडाणे सर व उपप्राचार्य श्री संग्रामे सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेंजर व गाईडने स्वतः राख्या बनवून जवळपास 550 विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या .या कार्यक्रमाचे मार्गदर्शक रेंजर लीडर प्रा. संध्या येलेकर व गाईड लीडर सुनिता चुधरी त्याचबरोबर नीरज ढोरे सर यांनी सहकार्य व प्रयत्न केले. शाळेच्या प्राचार्य वैशाली मडावी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.