BREAKING NEWS:
क्रीड़ा गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी खेळाडूंची निवळ .

Summary

गडचिरोली : राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या खेळाडूंची निवड गडचिरोली, ता. ३ : गडचिरोली जिल्हा अँमॅच्युअर बुद्धिबळ संघटना , अजब गजब विचार मंच गडचिरोली व दंडकारण्य शैक्षणीक व सांस्कृतीक विकास संस्था गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने […]

गडचिरोली : राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू.
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या खेळाडूंची निवड
गडचिरोली, ता. ३ : गडचिरोली जिल्हा अँमॅच्युअर बुद्धिबळ संघटना , अजब गजब विचार मंच गडचिरोली व दंडकारण्य शैक्षणीक व सांस्कृतीक विकास संस्था गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल २०२३ वयवर्षे ७, ९, ११, १३, १५ वर्षांखालील मुला-मुलीची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा स्थानिक राजस्व बचत भवनात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी प्रशांत दोंदल, प्राचार्य वंदना मुनघाटे उपस्थित होते. जिल्ह्यातील १५ वर्षाखालील ६० मुला-मुलींनी वेगवेगळ्या गटात भाग घेतला. निवड स्पर्धेतुन प्रत्येक गटात दोन मुले आणि दोन मुलींची निवड पुढे होणार्‍या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली. ७ वर्षे वयोगटात मुलामध्ये प्रथम रुद्रा ठाकरे, द्वितीय अमेय कासर्लावार, मुलींमध्ये प्रथम अनया वायलरवार व द्वितीय मायरा राठी ,९ वर्षे वयोगटात प्रथम अधिज अप्पलवार व द्वितीय शिवांश वाटे व मुलीमध्ये प्रथम गेशना चिचघरे व द्वितीय भुमी धरमशाली, ११ वर्षे वयोगटात मुलामध्ये प्रथम सार्थक वासेकर व द्वितीय प्रणित ठाकरे, मुलींमध्ये प्रथम श्रिया कुद्रपवार, १३ वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम अर्नव पेद्दीवार, द्वितीय ओम मरसकोल्हे व मुलींमध्ये गार्गी बल्लमवार १५ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सोहम चिलमवार, द्वितीय विराज ठाकरे व खेळाडूंना चषक व पदक व प्रमाणपत्र गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चलाख , नेञरोग तज्ज्ञ डाँ. अद्वेय अप्पलवार, बुद्धीबळ आर्बिटर श्री. रितेश उरकुडे श्री.वेंदात बांडे , गडचिरोली जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सतीश त्रिनगरीवार , उपाध्यक्ष आशुतोष कोरडे व सचिव सचिन मुन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राहुल भोयर , रूपेश ठाकरे व नितीन चिचघरे यांनी सहकार्य केले.

प्रा शेषराव येलेकर
. सहकारी संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *