राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठीच्या सुकाणू समितीत शालेय शिक्षण राज्यमंत्री सहअध्यक्ष
Summary
मुंबई, दि. 16 : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 मे, 2023 रोजी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन […]
मुंबई, दि. 16 : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 मे, 2023 रोजी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांच्याऐवजी समितीचे सहअध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि समितीचे उपाध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण विभागाचे सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त हे समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण घोरण 2020 लागू करण्यात आले आहे. शिक्षण धोरणाची राज्यात टप्याटप्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती हा याचाच एक महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचा सहअध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे.
०००००
