राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आज एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील :-आरोग्य मंत्री राजेश टोपे
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क कोरोना रिपोर्ट वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क कोरोना रिपोर्ट वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील ५० हजार जणांचे लसीकरण आज झाले.*
*आज अखेर महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आज तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आली.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९