राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. 1 : राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी दिले. भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भातील निकषांबद्दल राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव […]
मुंबई, दि. 1 : राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी दिले.
भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भातील निकषांबद्दल राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, उपसचिव श्री. एस. एम. खाडे तसेच निकष बदलण्याच्या अनुषंगाने मागणी केलेले रामचंद्र पिल्दे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांना नियमित सन्मान निवृत्तिवेतन मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकांची यादी नियमितपणे अद्ययावत करण्याबाबत विभागाने सूचना द्याव्यात, असे निर्देशही श्री.भरणे यांनी यावेळी दिले.