राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा, आपला भंडारा जिल्हा
जिल्हय़ातील शेवटचा कोवीड रुग्ण बरा झाल्याने राज्यात पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरणे हि आपल्यासाठी फारच अभिमानास्पद बाब आहे. याचे सर्व श्रेय कोविड फ्रन्टलाइन वॉरियर्स, सामाजिक संस्था व संघटना, सुव्यवस्थित व नियोजित आरोग्य यंत्रणा, सतत अग्रेसर पोलीस प्रशासन, शासकीय, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना जाते. छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे या सर्वांना मानाचा मुजरा. देशावर राज्यावर व जिल्ह्यावर अशा प्रकारचे संकट पुढेमागे ओढवले तरीही आपले शासन-प्रशासन मागे येणार नाही याची प्रचिती या या यशातून येताना दिसतेय. *छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर* अशा कार्याला पुनश्च अभिवादन करतो आहे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर