*राज्यस्तरीय बेस्ट मेकअप ऑर्टिस्ट पुरस्काराने कांद्री ची कल्याणी सरोदे चा गौरव*
*नागपुर* कन्हान : – रिसिल डॉट इनच्या वतीने दिला जाणारा सन २०२१ चा राज्यस्तरीय बेस्ट मेकअप ऑर्टिस्ट पुरस्काराने कांद्री-कन्हान च्या कल्याणी सरोदे यांना नाशिक येथे सम्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रविवार दि.२८ फेब्रु वारी २०२१ रोजी नाशिक येथे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॉफी आणि बरच काही, मितवा, सांग नारे, रेडिमिक्स, पवित्र रिस्ता, अजिंक्य मराठी चित्रपटाच्या अभिनेत्री (कलाकार) प्राथणा नेहेर यांच्या हस्ते राज्यस्तरीय बेस्ट मेकअप ऑर्टिस्ट पुरस्काराने कांद्री-कन्हान च्या कल्याणी सरोदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रिसील संस्थेचे संस्थापक सुधीर कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन ४१०० नामांकन प्राप्त होऊन ८० उद्योजकांचा येथे गौरव करण्यात आला असुन यातच मेकअप आर्टिस्ट पुरस्काराने कल्याणी सरोदे यांना सम्मानीत करण्यात आल्याने अनेक माध्य मातुन व कलाक्षेत्रातुन कल्याणी सरोदे हीचे कौतुक करण्यात आले आहे.
कांद्री-कन्हान ची कल्याणी सरोदे ही मेकअप आर्टिस असुन समाजसेवी म्हणुन संताजी तेली समाज बिग्रेड नागपुर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदावर आहे. अनेक पुरस्कार प्राप्त करणारी कल्याणी सरोदे यांनी याप्रसंगी समाजातील आणि इतर मुलीनी सुध्दा कुणा कडुन अपेक्षा न करता आपल्या कलागुणा चे कौशल्य प्रामाणिक पणे सादर करून स्वतः आत्म निर्भर होऊन मान प्रतिष्ठा प्राप्त करायला पाहीजे असे याप्रसंगी सांगीतले.
संजय निम्बाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147