राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात ६ स्वर्ण, २ सिल्वर, ३ कास्य पदक व ओरल चॅम्पियनशिप झेप
विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन नागपूर यांच्यातर्फे राज्यस्तरीय मुले आणि मुली सीनियर पाॅवरलिफ्टिंग व राष्ट्रीय चाचणी स्पर्धा १३ ते १४ जुलै २०२४ ला धवल पॉलीटेक्निक कॉलेज राजू नगर वर्धा रोड नागपूर येथे पार पाडल्या.
स्पर्धेत राज्यातून १९७ खेळाडू सहभागी झालेले होते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करित खेळाडू सहभागी झाले.
या स्पर्धेत १) रश्मी जिजुलवार ५७ किलो वजन गटात मध्ये ३९० किलो उचलून कांस्य पदक, २) प्राजक्ता डुकरे ६९ किलो वजन गटा मध्ये किलो उचलून कांस्य पदक, ३) तनवी रहाटे ७६ किलो वजन गटांमध्ये ३४५ किलो उचलून स्वर्ण पदक, ४) सानिका बारापात्रे ८४ वजन गटामध्ये २४५.५ किलो उचलून कांस्य पदक, ५) हेमंत मडावे ५९ वजन गटांमध्ये ४०७.५ किलो उचलून कास्य पदक ,६) विशाल मेश्राम ६६ वजन गटात ४७२.५ किलो वजन उचलून सुवर्ण पदक , ७) अर्पण कोठारी ७४ किलो वजन गटात ६१७.५ किलो वजन सुवर्णपदक, ८) अमित येरगुडे ८३ किलो वजन गटात ६२५ किलो वजन सुवर्णपदक, ९) प्रवीण दडमल ८३ किलो वजन गटात ५७७.५ किलो वजन सिल्वर पदक, १०) शुभम गणपाडे ९३ किलो वजन गटात ६०२.५ किलो वजन सुवर्ण पदक, ११) वीरेंद्र सिंग १२०+ किलो वजन गटात ५९५ किलो वजन सुवर्णपदक पटकावलेले आलेले*
या स्पर्धेत तेजस श्रीराममोजीवार, विक्रम लांडगे, गोवर्धन प्रजापती, विक्रम कोहापुरे, साहिल शेख यांनी सहभागी झालेले आहेत.
खेळाडूंनी ६ स्वर्ण पदक, २ सिल्वर पदक ३ कास्य पदक व चंद्रपूर जिल्ह्याला ओरल चॅम्पियनशिप पटकावलेले आहेत.
पदक पटकावलेल्या खेळाडूंनी सर्व श्रेय त्यांच्या आई-वडिलांना व प्रशिक्षक व टीम मॅनेजर आणि चंद्रपूर जिल्हा शक्तितोलन (पॉवरलिफ्टिंग) असोसिएशन पदाधिकारी यांना दिलेले आहे.
या सर्व खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा शक्तितोलन (पॉवरलिफ्टिंग) असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुरेश पाचपोर, उपाध्यक्ष श्री. रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष श्री. कुमार पिंजरला, सचिव श्री. गजानन पांडे, सदस्य श्री. योगेश तोडे, श्री. धम्मा रामटेके, श्री. प्रदीप शिंदे, श्री. महेंद्र कटरे, तसेच प्रशिक्षक अर्पण कोठारी, मार्गदर्शक अमोल आवळे, या सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केलेले आहेत.