राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत कोंढाळी संघाची दमदार खेळी
कोंढाळी : प्रतिनिधी – दुर्गा प्रसाद पांडे
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दि ५ ते ७ मे दरम्यान झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय ज्युनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथील पार पडलेल्या स्पर्धेत नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा ला. भू. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे कोंढाळी ता काटोल संघाने कांस्य पदक पटकाविले. तत्पूर्वी सेमी फायनल स्पर्धेत सातारा संघा सोबत चुरशीचे लढतीत पराजीत झाल्याने तिसऱ्या स्थानाकरिता यजमान वाशिम विरुद्ध नागपूर चुरशीचे लढतीत कोंढाळी संघ विजेता ठरला. स्पर्धेत नागपूर ( कोंढाळी)संघाने यापूर्वीचे लीग मॅचेस मध्ये सोलापूर संघाला 19 गुणाने व ठाणे संघावर 9 गुणाने मात करीत उपांत्य पूर्व सामन्यात पुणे संघावर 3 गुणाने मात करून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळविला. वाशिम संघावर मत करीत कांस्य पदकाचे मानकरी होण्यास सुयश मिळविले. विजयी संघात दिव्यांनी धुर्वे, ममता घाटोळे, प्रणिता चव्हाण(कर्णधार),रेणुका कळसे, समीक्षा देशमुख, नम्रता कोकर्डे, डिम्पल घाटोळे,मीनाक्षी शेंडे,दृष्टी देवघरे, रिद्धी किरपाने, तनु राजुके, प्रतिक्षा धारपुरे खेळाडूंचा समावेश होता. यापूर्वी 2022 -23 महाराष्ट्र क्रीडा व खेळ सनचनाली पुणे द्वारा आयोजित यावर्षीच्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धा सातारा येथे 17 वर्ष वयोगटात याच संघाने राज्याचे अजिंक्य पद पटकाविले आहे.हे विशेष! संघाला प्रशिक्षक सुधीर बुटे, हरीश राठी, उज्वल मोटघरे, भूषण राचलवार यांचे मार्गदर्शन लाभले.विजेता संघाला संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ श्यामसुंदरजी लद्धड, संचालक राहुल लद्धड, प्राचार्य गणेश शेंबेकर व शिक्षक व कर्मचारी वृंदानी खेळाडू प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
**********
फोटो कॅपशन- राज्य डॉज बॉल स्पर्धेत कोंढाळीचा कास्य पदक स्वीकारतांना मान्यवर डॉ हनुमंत लुंगे, राजेश जाधव, सुधीर बुटे भूषण राचेलवार विजेता खेळाडू
