गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचा संविधान दिन उत्साहात संपन्न ! सर्व शाखांसाठी राज्यशास्त्र विषय अनिवार्य करावा — राज्याध्यक्ष प्रा.सुमित पवार! संविधानातील विचार क्रांतिकारक –ऍड असीम सरोदे

Summary

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचा संविधान दिन ऑन लाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार होते. तर प्रसिद्ध संविधानतज्ञ ऍड असीम सरोदे प्रमुख वक्ते होते. राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद फक्त शैक्षणिक क्षेत्रात काम करते. ही राजकीय […]

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचा संविधान दिन ऑन लाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार होते. तर प्रसिद्ध संविधानतज्ञ ऍड असीम सरोदे प्रमुख वक्ते होते.

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद फक्त शैक्षणिक क्षेत्रात काम करते. ही राजकीय परिषद नाही. परिषदेने स्थापनेनंतर कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी विविध नवोपक्रम राबविले आहेत. सध्या इयत्ता अकरावी व बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकातून ‘संविधान’ हा अभ्यासक्रम बाजूला केला आहे ही खरी शोकांतिका आहे. विद्यार्थीदशेत भारतीय संविधानाचे महत्व समजण्यासाठी व भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्यासाठी ‘राज्यशास्त्र’ हा विषय कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी अनिवार्य केला पाहिजे. यासाठी परिषद राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल, असे प्रतिपादन राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी केले.
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अँड. असीम सरोदे प्रमुख वक्ते होते. त्यांनी ‘संविधानिक नैतिकता आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात राज्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
अँड. असिम सरोदे म्हणाले, संविधानातील विचार क्रांतिकारक विचार आहे. यामुळे लोकशाही यशस्वी करण्यासाठी संविधान महत्वाचे आहे. सर्व नागरिकांच्यात जबाबदारीची व देशप्रेमाची भावना अखंडिपणे जागृत ठेवण्यासाठी संविधानाबाबतचे प्रशिक्षण दिले पाहिजे.
अँड. सरोदे पुढे म्हणाले, अनेक नागरिक संविधानाबाबत अनभिज्ञ आहेत. ते संविधानविरोधात वागतात. त्यांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी संविधान समजून घेतले पाहिजे. यातून जनतेच्या मनामनात समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता याविषयी जागरुकता निर्माण झाली पाहिजे. तर लोकशाहीचा जिवंतपणा टिकून राहिल.
प्रा. संजय सुतार प्रास्ताविक केले. प्रा. संजीव वाहूरवाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. हर्षदा दरेकर यांनी संविधान उदेशपत्रिकेचे वाचन केले. प्राचार्य हेमंत चौधरी (यवतमाळ) यांनी आभार मानले. प्रा. हर्षदा दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य समन्वयक प्रा. संध्या येलेकर, प्रा.गौतम डांगे, प्रा. किशोर बुरबुरे प्रा.जुवरे,प्रा. मदनकर यांनी सहकार्य केले.

प्रा शेषराव येलेकर
विदर्भ चीफ न्यूज ब्यूरो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *